
सोनाळा येथे गिधाडाचे रेस्क्यू! वैद्यकीय तपासणी नंतर संशोधन केंद्रात स्थलांतर
श्याम बोरपी
संग्रामपुर प्रतिनिधी :- संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गाव परिसरात आज दि.१४ जानेवारी रोजी दुपारी एका दुर्मिळ गिधाड पक्ष्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभाग व पशुवैदकीय विभागाने तत्काळ हालचाली करत सदर गिधाडाचे सुरक्षित रेस्क्यू केले. रेस्क्यू केलेल्या गिधाडास पशुवैदकीय दवाखाना, सोनाळा येथे दाखल करून सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गिधाडावर E96 व M89 असे टॅगिंग क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. पशुवैदकीय अधिकारी डॉ.प्रमोद जाधव यांनी गिधाडाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले. ही संपूर्ण कारवाई राहुलसिंह तोलिया उपवनसंरक्षक, अकोट, गणेश टेकाडे सहाय्यक वनसंरक्षक, अकोट, अजय बावणे व.प.अधिकारी सोनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या रेस्क्यू मोहिमेत कपिल मोरे वनरक्षक, सालवन बिट, पी. ए. जगरवाल वनरक्षक, पिंगळी बिट, एन. वाय. पळसपगार सोनाळा परिक्षेत्र, चेतनजी वर्मा वन्यजीव प्रेमी, सुनील सखाराम खिराळे, आरिफ केदार, सुमित भास्कर वनसेवक तसेच सूर्या सूत गिधाड पर्यवेक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपासणीनंतर सदर गिधाडास पुढील निरीक्षण व संवर्धनासाठी सोमठाणा येथील गिधाड संशोधन केंद्रात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही कारवाई उल्लेखनीय ठरत असून वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



