पत्रकार व अधिकारी यांच्यात समन्वय असणे गरजेचे ; तहसीलदार प्रशांत पाटील संग्रामपूर
महसूल प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालय येथे तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार

प्रभुदास पारस्कार :-
सकारात्मक पत्रकारीता हीच काळाची गरज आहे यातुन प्रशासन गतीमान करण्याचे काम प्रसार माध्यमातुन होत असते . पत्रकार हा चुका लक्षात आणुन देण्याचे काम करत असतो त्यामुळे प्रशासनालाही चुका दुरुस्त करून योग्यतेनुसार काम करत येते .प्रशासकीय व्यवस्थेत सेवा देत असलेले अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांचेत विधायक कामासाठी समन्वय असला तर जनहिताच्या शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहोचवता येतात म्हणून प्रशासन चालविताना पत्रकार महत्त्वाची व्यक्ती असुन पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असते असे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी 06 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना केले . पत्रकार दिन निमित्ताने महसूल प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील होते . यावेळी जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने ,प्रल्हाद दातार व रामेश्वर गायकी यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांचा सत्कार घेतल्याबद्दल महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले . संचलन पत्रकार नारायण सावतकर यांनी केले .यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना डायरी पेन भेट म्हणून तहसीलदार यांचे हस्ते देण्यात आले . यावेळी नायब तहसीलदार वसावे विकास शिंदे यांनी बोलताना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या . कार्यक्रमास वरील मान्यवरांसह प्रल्हाद सावतकर डॉ . सहदेवराव गोतमारे ,काशिनाथ मानकर. मकसुद अली.सचिन पाटील युसुफ शेख नंदु शिरसोले सतीश वानखडे दयालसिंग चव्हाण सुचित धनभर डॉ . समीर बावनबीर कैलास खोट्टे .सुमित दामोदर. साबीर भाई, नामदेव येऊतकर, रवींद्र दांडगे ,विठ्ठल निंबोळकर सुनील ढगे , सुनील मुकुंद ,संतोष आगलावे, प्रभु पारस्कर, अशोक आकोटकर भारत इंगळे इ . पत्रकार उपस्थित होते .



