पोलिसांच्या तात्परतेने वाचले एकाचे प्राण.
ठाणेदार संदीप काळे यांच्या कौतुकास्पद मदतीने त्यांचे सगळीकडे कौतुक

सोनाळा (प्रतिनिधी) सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा येथील दीपक जयराज भटकर हे मोताळा वरून नांदुरा कडे येत असताना फुली गावाजवळ त्यांची स्कुटी स्लिप होऊन त्यांचा अपघात घडला.आजच्या या घटनेत योगायोगाने सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे हे बुलढाण्याहून सोनाळ्याकडे येत होते. अपघातग्रस्ताला रस्त्यावर पडलेले पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवली, आधार कार्डच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवली आणि तात्काळ नातेवाईकांना माहिती दिली. केवळ कर्तव्यापुरते न थांबता माणुसकीच्या भावनेतून ठाणेदार संदीप काळे व इंगळे मेजर यांच्यासोबत जखमी दीपक भटकर यांना प्राथमिक उपचारासाठी PHC शेंबा येथे घेऊन गेले. आजच्या धावपळीच्या आणि संवेदनाहीन होत चाललेल्या समाजात अनेक जण अपघात पाहूनही पुढे निघून जातात, पण ठाणेदार संदीप काळे यांनी गाडी थांबून त्याला प्राथमिक उपचारासाठी दवाखान्या मध्ये नेले या घटनेने पोलिसातील माणसाचे दर्शन घडले तसेच पोलीस म्हणजे केवळ कायद्याचा अंमल करणारे नसून संकटात सापडलेल्या माणसासाठी आधार बनणारे देवदूत आहेत. सध्या पेशंटची तब्येत चांगली असून पुढील उपचारासाठी RHC मोताळा येथे रेफर करण्यात आले आहे. सोनाळा पोलीस ठाणेदार काळे साहेब यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कृतीतून माणुसकी, कर्तव्यदक्षता आणि समाजभान यांचा आदर्श घालून दिला आहे. पोलिसांविषयी अभिमान वाटावा अशी, हृदयाला स्पर्श करणारी आणि सन्मान वाढवणारीया घटने मुळे ठाणेदार संदीप काळे यांचे कौतुक सर्वत्र परिसरात होत आहे .


