दत्तक ग्राम वसाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न ;आदिवासी कनिष्ठ कला महाविद्यालयाचा उपक्रम
शिबीर समारोपीय कार्यक्रमास मा.ठाणेदार संदीप काळे यांचे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन .

प्रभुदास पारस्कार विषेश प्रतिनीधी :- संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी कनिष्ठ कला महाविद्यालय टुनकी बु येथे राष्ट्रीय सेवा योजना प्लस टु (+2) स्तर चे युनिट शैक्षणिक सत्र 2025-26 चे विशेष ग्रामीण शिबिर दिनांक 21 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 पर्यंत दत्तक ग्राम वसाडी येथे शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राठोड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ,दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले .वसाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. समजकौर बाबर, पोलीस पाटील जुम्मा पालकर, तालुका कृषी अधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
सदर शिबिरादरम्यान सकाळच्या सत्रात विद्यार्थी शिबिरार्थी यांनी प्रथम ग्राम स्वच्छता अभियान राबविले या दरम्यान गावातील साफसफाई करण्यात आली . त्यासोबत ग्राम वसाडी येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, इको सायन्स पार्क येथे सुद्धा साफसफाई करण्यात आली. तसेच लोकवर्गणीतून तयार होत असलेल्या क्रिडा मैदानासाठी सुद्धा श्रमदान करण्यात आले .
दुपारी बौद्धिक सत्रात तालुका कृषी अधिकारी संजय जाधव, वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश घनोकार, राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समन्वयक राठोड सर, गावंडे सर, जाधव सर , वसाडी येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते हुसेन पालकर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
27 डिसेंबर रोजी शिबिर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रचलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले .
मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन तथा शिबिराचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .प्राचार्य श्री धामोळे सर यांनीही शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देत शिबिरा दरम्यान दिलेले श्रमदान याचे महत्त्व सांगितले .कार्यक्रमाधिकारी श्री मेहरे सर यांनी संपर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व समारोपीय कार्यक्रमात शिबिराचे महत्त्व समजून सांगितले . यावेळी पोहेकॉ विनोद शिंब्रे सोनाळा पोलीस कर्मचारी व श्री.चांदुरकार सर, श्री नेमाडे सर , काळे मॅडम समस्त शिक्षक वृंद उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य श्री .धामोळे सर, कार्यक्रमाधिकारी श्री मेहरे सर, सरीन सुरत्ने सर,कार्तिक काकर, रेवलसिंग सुलीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रेवलसिंग सुलीया यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.सरीन सुरत्ने यांनी केले .
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला .



