बावनबिर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळ ! रद्दी पेपरवर दिली खिचडी !
मुख्याध्यापक व संबधित शिक्षकावर पालकांची कारवाईची मागणी....

बुलढाणा (प्रतिनिधी ) संग्रामपूर तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. शाळेतील मुला मुलींना चक्क रद्दी पेपरवर खिचडी देण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून शिक्षण विभागातील निष्काळजीपणाचा हा गंभीर प्रकार मानला जात आहे. शासनाने शालेय पोषण आहारासाठी काटेकोर नियमावली तयार केली असून प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांसाठी स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या जिल्हा परिषद शाळे त मध्ये स्टीलच्या प्लेट ऐवजी रद्द कागदावरच खिचडी वाढली जात असल्याचे दृश्य व्हिडिओ स्पष्ट दिसते इतकेच नव्हे तर पोषण आहार घेत असताना विद्यार्थ्यांच्या स्वभावताली शान मुक्तपणे फिरताना दिसत आहेत अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या आधीच घटत असताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जात असल्याचे पालकाचे म्हणणे आहे या प्रकाराबाबत जिल्हा शिक्षण अधिकारी विकास पाटील यांना विचारणा केली असता चार महिन्यापूर्वी सर्व शाळांना आदेश दिले होते. असे त्यांनी सांगितले तरी प्रत्यक्षात अनियमतता सुरूच असल्याने याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान संग्रामपूर गटशिक्षण अधिकारी दीपक टाले यांनी केंद्रप्रमुखांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे अहवालानंतर संबंधित त्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले. प्रकारामुळे शालेय शिक्षणमंत्री हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



