शाळेत फुलवली नैसर्गिक पोषण परसबाग !
सोनाळा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत पौष्टिक पालेभाज्या अन फळभाज्या बहरल्या......

प्रतिक्रीय :- सपूर्ण शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकरी कश्या प्रकारे पिक घेतात या विषयी मुलांना फळभाज्या विषयी अभ्यासक्रमाच्या उदेशाने जिल्हा परिषद कन्या शाळेने चांगला उपक्रम केला आहे .– भीमराव वानखडे सोनाळा केंद्रप्रमुख
शामकुमार बोरपी
सोनाळा ( प्रतिनिधी ) सोनाळा येथील जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक पालेभाज्या व फळभाज्यांची ओळख व्हावी, महत्त्व समजावे, या हेतूने जिल्हा परिषद मराठी मुलीच्या शाळेत शिक्षकांच्या कल्पकतेने अन् मुलीच्या मदतीने सेंद्रिय पद्धतीची परसबाग तयार करण्यात आली .गावाच्या मध्यभागी असलेली शाळेतील परसबाग आवर्जून पाहण्यासारखी आहे. परसबागेत शाळेतील शिक्षकांच्या मदतीने, तसेच शाळा समितीचे अध्यक्ष सतीश वानखडे यांच्या संकल्पनेतून परसबागेत विविध प्रकारच्या पौष्टिक पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड करण्यात आली. शाळेमधील परसबाग मध्येलावण्यात येणारे फळ भाज्या वांगी, मिरची, टोमॅटो, पतागोबी, फुलगोबी,पालक, सांबार आदी वेलींची लागवड करण्यात आली.
शाळा समितीचे अध्यक्ष यांच्या पाठपुरावाने शाळेला जागा उपलब्ध करुण दिल्याने परसबाग मोठया प्रमाणात भरताना दिसत आहे. आजही ही परसबाग शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे व पौष्टिक घटक देत आहे. या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केली असून, यासाठी कुठल्याही रासायनिक खताची अथवा रासायनिक औषधांची फवारणी केलेली नाही. जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. परसबागेतील विषमुक्त भाज्यांचा आस्वाद शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षक घेत आहेत, तसेच विद्यार्थ्यांसाठी देण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पोषण आहारातही भाज्यांचा समावेश करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करताना परसबागेचा भरपूर उपयोग होतो. परसबागेसाठी मुख्याध्यापक गजानन नेमाडे व शिक्षकानी परिश्रम घेतले. सोनाळा केंद्रप्रमुख भीमराव वानखडे यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.



