युवा शेतकरी अजिंक्य तिडके यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हातुन सत्कार
अजिंक्यच्या माध्यमातून संत्राचे फ्रान्स या देशात व्यापार

- शाम बोरपी
सोनाळा (प्रतिनिधी) संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल सोनाळा येथील संत्रा उत्पादक शेतकरी अजिंक्य तिडके यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गेल्या पाच वर्षापासून संत्रा उत्पादनात संग्रामपूर तालुक्यामध्ये अग्रेसर शेती करणारे तसेच खरेदी व विक्री च्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना योग्य तो भाव देणारे युवा शेतकरी अजिंक्य तिडके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील फळांना योग्य भाव मिळाला तसेच मूर्ग बहार गळतीच्या लहान लहान संत्रांना कुठेही भाव नसल्याने सर्व शेतकऱ्यांचा शेता मधील लहान संत्रां एकत्रित रित्या जमा करून भारतातील अनेक ठिकाणी तसेच फ्रान्स व इतरही देशात सुद्धा व्यापाराच्या माध्यमातून पाठवतात . आपली उद्योजकाच्या माध्यमातून आपल्या कमी वयात युवा शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून अजिंक्य तिडके यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या या सत्कारामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.