वरवट बकाल येथे व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराला “उत्पुर्स प्रतिसाद”
व्हॉइस ऑफ मीडिया चे मोफत आरोग्य शिबीर वरवट बकाल येथे संपन्न .....

व्हॉइस ऑफ मीडियाचा सामाजिक उपक्रम; वरवट बकाल येथे मोफत हृदयरोग निदान शिबिर संपन्न …
शामकुमार बोरपी
संग्रामपुर (प्रतिनिधी )“व्हाईस ऑफ मीडिया” ही एक आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आहे, जी पत्रकारांचे हक्क, कल्याण आणि पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी काम करते,आणि इतर सामाजिक ,आरोग्य विषयक गोर गरीब जनतेला मदत करणारी संपूर्ण जगभर मध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये लोकांच्या हिताचे व आरोग्याचा विचार करून त्या विषयी काम करणारी व्हाईस ऑफ मीडिया जगातील एकमेव संघटना असल्याचे समजले जाते .त्या अनुषंगाने व्हाईस ऑफ मीडिया संग्रामपुर च्या वतीने रविवारी सकाळी १० वाजता भाऊ भोजने यांच्या निवासस्थानी वरवट (बकाल) या ठिकाणी ह्दय रोग निदान मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .
या शिबिरामध्ये श्री संत अच्युत महाराज हार्ट हास्पिटल अमरावती येथील तज्ञ डॉक्टराचा एक चमू येवून त्यांनी मधुमेह ,रक्तदाब ,व ह्दय रोग शिबिरात सहभागी शिबिरार्थींची तपासणी केली या मध्ये संत हॉस्पिटल चे व्यवस्थापक राजेन्द्रजी डीगंबर ,शिवराज शिंदे सचिव प्रा सागरजी पासेबंध डॉ ,शिवराज शिंदे डॉ.ऋषिकेश बकाल डॉ.प्रज्ञा रर्णीत ,डॉ.धवल तेली व प्राजक्ता वाडेकर ,सविता सायणारे , प्रज्ञा मूसदकर,प्रतिज्ञा वाघमारे ,निर्मला उईके ,धरती गडलिंग शीतल खंडारे ,जयेश खंदारे ,मगेश रताळे वैद्यकीय अधिकारी व त्यांची चमू त्या ठिकाणी होता .
सदर शिबिरामध्ये आरोग्याची तपासणी करण्या करिता मोठ्या संख्येने मधुमेह , रक्तदाब व हृदय रोग रुग्णांची गर्दी होती त्यामध्ये संग्रामपुर तालुक्यातील अनेक गावातील नागरिकाची संख्या मोठ्या प्रमाणत या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता तसेच शेगाव ,तेल्हारा ,जळगाव जामोद खामगाव ,अकोला येथुनही सुद्धा अनेक रुग्ण आली होती . त्यांनी मोठ्या प्रमाणत आरोग्य निदान शिबिरामध्ये आपली मोफत तपासणी करून घेत सदर शिबिराला मोठा प्रतिसाद दिला ,
“व्हाईस ऑफ मीडिया” ने ठेवण्यात आलेल्या शिबिराच्या आयोजन करिता मेडिकल क्षेत्रातील लोकांचे ही महत्वाचे योगदान लाभले तसेच “व्हाईस ऑफ मीडिया”चे जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी त्यांची सपूर्ण प्रकारे नागरिकांची तसेच डॉक्टर यांची राहण्याची सोय केली या शिबिरांमध्ये सर्वात मोलाचा वाटा हा भाऊ भोजने यांचा मोलाचा वाटा असल्याचे समजते तसेच गेल्या अनेक दिवसा पासून “व्हाईस ऑफ मीडिया”चे पत्रकार सदस्य यांनी सुद्धा मेहनत घेताना दिसले .या मध्ये जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने. जेष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार . संग्रामपूर तालुकाध्यक्ष मकसूद अली ,दयालसिंग चव्हाण- कार्याध्यक्ष, सतिश वानखडे सचिव, अशोक आकोटकर उपाध्यक्ष , रवि शीरसकार उपाध्यक्ष,
युसुफ खान उपाध्यक्ष , प्रभू पारस्कार कोशाध्यक्ष, नामदेव येऊतकार सहसचिव , सचिन पाटील, साबीरखान
सुमेध दामधर ,सुनिल ढगे , डॉ. समीर शेख, सूचित धनभर . नारायण सावतकार इत्यादी इत्यादी पदाधिकारी सदस्यांनी
आज झालेल्या वरवट बकाल येथील हृदय रोग निदान शिबिरात अथक परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडले सर्वांनी खूप मेहनतीने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला . शिबिरामध्ये सहभागी झालेले शिबिरार्थीनी व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार व्यक्त करत सदर उपक्रमाचे कौतुक केले .


