श्री संत सोनाजी महाराज भव्य क्रिकेटचे महासंग्राम……
सोनाळा मध्ये लाखो रुपयाच्या बक्षिसांची लय लूट......

श्याम बोरपी
सोनाळा प्रतिनिधी
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री संत सोनाजी महाराज हे एक ऐतिहासिक ठिकाण असलेल्या सोनाळा नगरीमध्ये युवकांच्या शिक्षणासोबत इतरही खेळांना आणि उत्सवांमध्ये अग्रेसर असलेल्या सोनाळामध्ये श्री संत सोनाजी महाराज क्रिकेट क्लब च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेटचे थरारक महासंग्राम व सामन्याचे आयोजन केले आहे. यामध्ये 1 जानेवारी 2026 च्या सुरुवातीलाच पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या हातून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी पोलीस ठाणेदार यांनी सुद्धा क्रिकेट या खेळाचा आनंद घेतला. या खेळाचे आयोजक श्री संत सोनाजी महाराज क्रिकेट क्लब च्या वतीने क्रिकेटचे महासंग्राम आयोजन केले आहे.या महासंग्रामामध्ये लाखो रुपयांची बक्षिसाची लय लूट बापू स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर अनेक क्रिकेट वीरांच्या आगमन सोनाळा नगरीमध्ये होणार आहे. क्रिकेटचे महासंग्राम तसेच थरारक सामने सुद्धा सोनाळा येथील बापू स्टेडियमवर क्रिकेट शोकिनांना बघायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोनाजी क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य दिव्य असा महासंग्राम आयोजन केले आहे यामध्ये सोनाजी क्रिकेट क्लब च्या वतीने मध्यप्रदेश, गुजरात, इतरही राज्यातून क्रिकेट खेळाडू येतात याचप्रमाणे महाराष्ट्रामधील पुणे मुंबई सातारा अमरावती अकोला नागपूर अनेक ठिकाणचे नामवंत क्रिकेट खेळाडू सोनाळा येथे आगमन होणार आहे या थरारक सामना पाहण्यासाठी 30 ते 40 हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा सोनाजी क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. क्रिकेट क्लब च्या वतीने क्रिकेट प्रेमींच्या सर्व प्रकारच्या खाण्यापिण्यापासून व्यवस्था बाप्पू स्टेडियमवर केल्याचे चित्र क्रिकेट ग्राउंडवर दिसत आहे. यामध्ये सोनाजी क्रिकेट क्लबच्या वतीने अनेक बक्षिसांचे लय लूट व जंगी लूट दररोज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यामध्ये हिंदी इंग्रजी व मराठी अशा तीन कॉमेट्री सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. सोनाळा येथील अनेक नामवंत व्यक्तींनी या ठिकाणी बक्षीस दिले आहे. तरी या क्रिकेट सामन्याचा अंतिम सामना 12 जानेवारी या दरम्यान ठेवण्यात येणार असल्याचे आयोजनाकडून बोलल्या जात आहे. या जंगी महासंग्रामाचे आयोजक सोनाजी क्रिकेट क्लब व गावातील राणा ग्रुप जाणता राजा ग्रुप व महाकाल ग्रुपच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी आयोजकाकडून या थरारक महासंग्राम क्रिकेट स्थळी भेट दिवून क्रिकेट वीरांनचे प्रोत्साहन व मनोबल वाढवावे.या करिता सोनाळा येथे यावे असे आवाहन आयोजक श्री संत सोनाजी महाराज क्रिकेट क्लब च्या वतीने आमच्या पत्रकाद्वारे सांगितले आहे..