जिल्हा परिषद मराठी शाळा टुनकी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी….
विद्यार्थ्यांनी भाषणे गीत गायन चारोळी सादर केल्या व इयत्ता दुसरी सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले .

संग्रामपूर प्रतिनिधी प्रभुदास पारस्कार :-
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा टुनकी येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती / बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . आज सर्वत्र सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून साजरा केला जातो . याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीधर चोरे, सदस्य सौ लक्ष्मी पारस्कर , राजु आप्तुरकर , राजेश बोदडे आणि शाहू फुले आंबेडकर वाचनालय टुनकी बु. संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र इंगळे व शाहू फुले आंबेडकर वाचनालय सचिव विजय दहिकार मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा मुख्याध्यापक श्री संजय इंगळे सर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले . सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेत विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या वेशभूषेत येत, भाषणे, गीतगायन, चारोळी सादर केल्या तसेच इयत्ता दुसरी सहावी व सातवी च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलेले ”फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? ” ही गीत कलाकृती सादरीकरण विशेष आकर्षण ठरली तसेच शाहू फुले आंबेडकर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचन स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक वर्ग पहिलाचा विद्यार्थी शिवांश राजू आपतुरकर, द्वितीया क्रमांक वर्ग 5वी ची विद्यार्थिनी उन्नती माधव टोपले आणि तृतीय क्रमांक मिळालेल्या वर्ग सहावीचा विद्यार्थी प्रणव प्रभुदास पारसकर या विद्यार्थ्यांचे शाहू फुले आंबेडकर वाचनालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले.अध्यक्षीय भाषण शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे सर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले . यावेळी शाळा मुख्याध्यापक इंगळे सर, श्री विश्वजीत वक्टे सर, श्री संजय दामधर सर, कु प्राजक्ता सातव मॅडम , कु मनीषा इंगळे मॅडम, श्री इफ्रान सुरत्ने सर, कु श्रुती लाहोटी मॅडम, श्री निलेश पवार सर, श्री रवींद्र चाटे सर , श्री सचिन कात्रे सर व विद्यार्थी पालक तसेच नागरिक उपस्थित होते .वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुत्र सांभाळत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु आरव कुलकर्णी व कु प्रणव पारस्कर या विद्यार्थ्यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जि प मराठी शाळेच्या शिक्षिका व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या पार पाडला .
शाहू फुले आंबेडकर वाचनालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देताना प्रभुदास पारस्कर



