सोनाळा येथील नंगा बाबा उर्फ समजोती बाबा याचा कढीच्या भांडाराचे दिनांक २५ नोव्हेबर रोजी आयोजन
आठ हजार लिटर ताका पासून कढी चा महाप्रसाद
शाम बोरपी प्रतिनिधी सोनाळा
सोनाळा (प्रतिनिधी ) सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपुर तालुक्यातील संत नगरी सोनाजी महाराज यांच्या रथउत्सव यात्रा मोहत्सव झाल्या च्या १५ दिवसाच्या कालावधी सपल्या नंतर नंगा बाबा उर्फ समजोती बाबा यात्रा महोत्सव दिनांक २५ नोव्हेबर रोजी १२ वाजता ला जगदंबा माता मंदिरा मध्ये नंगा बाबा उर्फ समजोती बाबा महाराज समाधी स्थळी यात्रा महोत्सव पार पडत असल्याची माहिती विश्वस्तांनी सांगितली तसेच या मध्ये सकाळी महाआरती व काल्याचे कीर्तन ह.भ.प काळे यांच्या मार्गदर्शना मध्ये होणार आहे . महाआरती नंतर परीसरा मध्ये हजारो भाविकांना कढी व भाकर या प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे . या यात्रे चे महत्व असे कि या ठिकाणी सात ते आठ हजार लिटर ताकाची कढी बनवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे .या महाप्रसादा करिता पंचकोशीतील हजारोच्या संखेने भक्तगण येथे कढीचा प्रसादाचा लाभ घेण्या करिता येतात . दिवसेंदिवस नंगा बाबा उर्फ समजोती बाबा यात्रा महोत्सव स्वरूप वाढत आहे .
नंगा बाबा उर्फ समजोती बाबा यांचे चमत्काराची महिमा परिसरात कढीच्या स्वरूपात अनेकांच्या शरीर प्रकृती चागली राहते व त्याच प्रमाणे अनेक बिमाऱ्या सुधा बऱ्या केल्या आहेत .या महाप्रसादाचा अनुभव अनेक भक्तांना आल्याचे लोक सांगतात.या महोत्सवा करिता गावातील भक्त गण सोमवार च्या रात्री पासून कढी बनवण्या करिता मेहनत घेणार आहे . या मध्ये सोनाळा येथील बचत गटाच्या व टाळ करी महिलां यांचा मोठा सहभाग नोंदविल्या जाते व त्यांचे मोठे योगदान दिले नंगा बाबा उर्फ समजोती बाबा हे भक्ताचे मोठे श्रेध्यस्थान आहे . गेल्या सात दिवसा पासून ह.भ.प श्रीकृष्ण महाराज काळे (रुधाणेकर) यांनी आपल्या पारायणातून लोकांना मंत्रमुग्ध केले . नंगा बाबा उर्फ समजोती बाबामहाराज विस्वास्थानी गेल्या एका महिन्या पासुन परिश्रम घेत व भाविकाच्या सहकार्याने हा यात्रा मोह्त्सव करत असून यंदा मोठ्या प्रमाणात अन्नदान व लोकांचे योगदान लाभात आहे .तरी अनेक भाविकांनी कढी च्या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे करावे असे विश्वस्त मंडळ समजोती बाबा संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे .


